राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, सरेंडर होण्यापूर्वी वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणात चार आरोपींना अटक झाली आहे तर तीन आरोपी फरार होते. या प्रकरणात वाल्मिकी कराड यांचे सूत्रधार म्हणून नाव घेतले जात होते. आज २२ दिवसानंतर वाल्मिकी कराड पुणे सीआयडी कार्यालयात शरण आले आहेत.
बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर गेले २२ दिवस फरार असलेला वाल्मिकी कराड हा अखेर पुणे सीआयडी कार्यालयात शरण आला आहे. त्याने शरण येण्यापूर्वीच एक व्हिडीओ शेअर करीत राजकीय द्वेषापोटी आपले नाव गोवले जात आहे असा दावा केला आहे. केज पोलिस स्टेशनला खोटी खंडणीची केस दाखल केली आहे.मला अटकपूर्व जामीनाचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफीस पुणे, पाषाण रोड येथे सरेंडर होत आहे. संतोष भय्या देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी, फाशी देण्यात यावी अशी मागणीही या व्हिडीओ वाल्मिकी कराड यांनी म्हटले आहे. आमच्या भावाची क्रुर हत्या झाली आहे, तो अजिबात सुटता कामा नये. पोलीस आणि सीआयडी यांनी हे तपास सिद्ध करावे लागणार आहे. वाल्मिकी कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय असल्याने त्यांनी तपासपूर्ण होईपर्यंत मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे.