माझी मराठी बांधवांना हात जोडून विनंती….राज ठाकरे यांनी काय केलं आवाहन

| Updated on: Jan 06, 2024 | 3:19 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगड येथील सहकार मेळाव्यात भाषण करताना मराठी बांधवांना हात जोडून विनवणी केली आहे. त्यांनी महाराष्ट्रातील राजकारण्यांपासून सावध रहाण्यास सांगितले आहे. जेव्हा जेव्हा महामार्ग झाले आहेत तेव्हा तेव्हा जमिनी कवडीमोल भावात विकत घेतल्या आहेत. त्यामुळे मराठी बांधवानांनी आपल्या जमिनी विकू नये असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

रायगड | 6 जानेवारी 2023 : रायगडमध्ये मनसेच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी बांधवांना एक कळकळीची विनंती केली आहे. जेव्हा जेव्हा रस्ते आणि महामार्ग झाले तेव्हा तेव्हा आपल्या हातून जमीन गेल्या आहेत. उद्या हा रायगड जिल्हा तुमच्या ताब्यात राहणार नाही. इथे विमानतळ येणार आहे. शिवडी न्हावा शेवा लिंक महामार्ग येथे येत आहे. त्यानंतर येथे विमानतळ होणार आहे. हे सर्व झाल्यावर इतर राज्यातील लोक येणार आणि तुमच्या नाकावर टिच्चून तुमच्या जागा विकत घेणार. उद्या तुम्ही मराठीही बोलणार नाही. त्यांचीच भाषा बोलणार. तुम्हाला धोक्याची सूचना आहे. हात जोडून विनंती आहे. तुमच्या आजूबाजूला काय चालू आहे ना. सतर्क राहा, असं राज ठाकरे यांनी म्हटले आहे. प्रत्येक जमिनी विकत घेतल्या जात आहेत. ही एक वेगळ्या एक प्रकारची सहकार चळवळ आहे. ती मराठी माणसाच्या विरोधातील आहे. महाराष्ट्राच्या विरोधातील आहे. बाबांनो समजून घ्या… उद्या तुमच्या हातातून जमीनी जातील, तेव्हा तुम्हाला पश्चातापाचा हात कपाळावर मारत बसावं लागेल. मी एवढंच सांगण्यासाठी आलो होतो. मी तुम्हाला सहकार चळवळ समजून सांगण्यासाठी आलो नाही. स्टेजवर तज्ज्ञ आहेत, ते तुम्हाला सहकार चळवळ समजावतील. मी फक्त तुम्हाला धोके सांगत आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.

Published on: Jan 06, 2024 03:19 PM