चना खरेदी बंद केल्याने आमदार यशोमती ठाकूर नाफेडवर कडाडल्या; म्हणाल्या, उद्याची न्यूज बघाच
काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर भडकल्याचे दिसून आले आहे. तसेच त्यांनी थेट नाफेडच्या अधिकाऱ्यांना फोन करत झापलं. त्याचबरोबर चना खरेदी बंदचा आदेश हा तोंडी कसा असून शकतो? लेखी असेल तर दाखवा असे म्हटलं धारेवर धरलं आहे
अमरावती : नाफेडने कोणतीही पूर्वसूचना न देता शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत किंमतीतील हरभरा खरेदी बंद केली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. बंद झालेली खरेदी पुन्हा सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी तिवसा येथील शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र यावर अजूनही नाफेडकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. यावरून काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर भडकल्याचे दिसून आले आहे. तसेच त्यांनी थेट नाफेडच्या अधिकाऱ्यांना फोन करत झापलं. त्याचबरोबर चना खरेदी बंदचा आदेश हा तोंडी कसा असून शकतो? लेखी असेल तर दाखवा असे म्हटलं धारेवर धरलं आहे. तसेच चना खरेदी बंद केल्यास तिव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर जे काही हे अधिकारी वर्गाचं लागलं आहे. ते मीडियासमोर आणू फक्त तुम्ही उद्याची न्यूज पहा असा दमच त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
Published on: Apr 17, 2023 12:02 PM