Nagpur Marbat: दोन वर्षानंतर नागपुरात निघणार काळी-पिवळी मारबत, 142 वर्षांची ऐतिहासिक परंपरा
मध्य भारतातली ही सर्वात मोठी आणि जुनी परंपरा आहे. या सोबतच पिवळी मारबत देखील निघते तीसुद्धा अतिशय भव्य असते. या दोनीही मारबत सेंट्रल एव्हेन्यू रोडवरील चौकात एकत्र येतात आणि गळाभेट घेतात.
गेली दोन वर्ष कोरोना काळात सार्वजनिक सण आणि उत्सवांवर निर्बंध होते. नागपूरमध्ये तब्बल दोन वर्षानंतर ऐतिहासिक काळी-पिवळी मारबत (Nagpur Marbat 2022) निघणार आहे. मारबतीच्या या मिरवणुकीचे हे 142 वे वर्ष आहे. आज सकाळी 10.30 वाजता या मारबत्तीला सुरवात होईल. काळी मारबत ही रोगराई, समाजातल्या वाईट प्रथा आणि भ्रष्टाचाराचे प्रतीक आहे. भोसले घराण्यातल्या बाकाबाई या इंग्रजांना फितूर झाल्या होत्या त्याच्या निषेधार्थ ही मारबत काढली जाते. या मिरवणुकीला हजारोंच्या संख्येने लोकं जमतात. मध्य भारतातली ही सर्वात मोठी आणि जुनी परंपरा आहे. या सोबतच पिवळी मारबत देखील निघते तीसुद्धा अतिशय भव्य असते. या दोनीही मारबत सेंट्रल एव्हेन्यू रोडवरील चौकात एकत्र येतात आणि गळाभेट घेतात. हा क्षण पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोकं दूरवरून येत असतात.
Published on: Aug 27, 2022 10:39 AM