‘त्या’वेळी तुम्ही शांत का होता?; चंद्रशेखर बावनकुळे यांना ठाकरेगटाच्या नेत्याचा सवाल
नागपूर : शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार अरविंद सावंत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली आहे. “चंद्रशेखर बावनकुळे यांना आता स्फुरण आलं आहे. ज्यावेळेस कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. महाराष्ट्राचे तत्कालीन महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवरायांचा अपमान केला. त्यावेळी दातखिळी कुठे बसली होती? महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान […]
नागपूर : शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार अरविंद सावंत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली आहे. “चंद्रशेखर बावनकुळे यांना आता स्फुरण आलं आहे. ज्यावेळेस कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. महाराष्ट्राचे तत्कालीन महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवरायांचा अपमान केला. त्यावेळी दातखिळी कुठे बसली होती? महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला हे हे भाजपचे ढोंगी लोक आहेत. भाजपचे सावरकरांबद्दलच प्रेम सुद्धा ढोंगी आहे”, असं अरविंद सावंत म्हणाले आहेत.
Published on: Apr 15, 2023 03:24 PM