कुणी कितीही दौरे करू द्या, राज्यात हवा महाविकास आघाडीचीच!; अमित शाहांच्या दौऱ्यावर काँग्रेस नेत्याची टीका

| Updated on: Apr 16, 2023 | 1:09 PM

Balasaheb Thorat on Amit Shah : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय मंत्री अमित शाहांना टोला लगावला आहे. महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आज नागपूरमध्ये होतेय. त्याआधी थोरातांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला.

नागपूर : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय मंत्री अमित शाहांना टोला लगावला आहे. कुणी कितीही दौरे करू द्या. राज्यात हवा महाविकास आघाडीचीच आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणालेत. अजित पवारांवर आमचा आणि महाविकास आघाडीचा विश्वास आहे. मात्र महाविकास आघाडीत फूट पाडण्याचे प्रयत्न चालले आहेत. पण आम्ही एक आहोत. आजची सभा विरोधक पाहतील. महाविकास आघाडीचं वातावरण आहे, हे विरोधकांनाही माहिती आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. येत्या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला लोक निवडणून देतील. वज्रमूठ सभेला होणारी गर्दी लोकांचा महाविकास आघाडीवर असणारा विश्वास दाखवते, असं थोरात म्हणाले आहेत.  महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आज नागपूरमध्ये होतेय.या सभेआधी थोरातांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय.

Published on: Apr 16, 2023 01:08 PM
मविआच्या वज्रमुठ सभेवर शिंदे यांच्या मंत्र्याची टीका; म्हणाले, त्यांना आता काम नाही
वादानंतर शिवानी वडेट्टीवार यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘…आणि मी सत्य बोलले’