भाजप सोडल्यास सगळेच पक्ष प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखे वागतात; काँग्रेस नेत्याकडून तोंडभरून कौतुक
Ashish Deshmukh on BJP : काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची पक्षातून हकालपट्टी केली जाणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच त्यांनी भाजपचं तोंडभरून कौतुक केलं आहे. पाहा व्हीडिओ...
नागपूर : काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची पक्षातून हकालपट्टी केली जाणार असल्याचं बोललं जात आहे. लवकरच त्यांना काँग्रेसमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार असल्याची चर्चा असतानाच आशिष देशमुख यांच्या प्रतिक्रियेने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी भाजप सोडल्यास सगळेच पक्ष प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखे वागतात, असं म्हटलं आहे. लोकशाही मूल्यांवरती सगळ्यात खुला असणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे, असंही आशिष देशमुख म्हणाले आहेत. आशिष देशमुख यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आशिष देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याचीही चर्चा नागपुरातील राजकीय वर्तुळात होत आहे.
Published on: Apr 06, 2023 11:50 AM