महाविकास आघाडीत फूट पाडायचा प्रयत्न चाललाय, पण…; पृथ्वीराज चव्हाण विरोधकांवर बरसले
Prithviraj Chavan on Mahavikas Aghadi Vajramuth Sabha : महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा; पृथ्वीराज चव्हाण यांचा विरोधकांना इशारा, म्हणाले...
नागपूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री, आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज माध्यमांशी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. महाविकास आघाडीत फूट पाडायचा शिंदे-फडणवीस सरकारचा प्रयत्न सुरू आहे. पण आम्ही तिन्ही पक्ष ठाम आहोत. एकमेकांसोबत आहोत, असं पृश्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. आज संध्याकाळी महाविकास आघाडीची संयुक्त बैठक होणार आहे. सात आठ सभा घेण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आजच्या वज्रमूठ सभेला हजर आहेत, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. देशातील जे वातावरण आहे ते मोदींच्या आणि भाजपच्या विरोधात आहे. हे वेळोवेळी अधोरेखित होतंय. सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार शिंदे-फडणवीस सरकारवर आहे. या संदर्भात काही हालचाली आहे का? त्याच्यावर आमची चर्चा होणार आहे, असंही ते म्हणालेत.
Published on: Apr 16, 2023 04:16 PM