खोपोली अपघातावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

| Updated on: Apr 15, 2023 | 12:53 PM

Pune Mumbai Highway Bus Accident : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बस दरीत कोसळली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे.

नागपूर : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बसचा भीषण अपघात झालाय. खासगी बस दरीत कोसळली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे. “खोपोलीत दुर्दैवी घटना घडली आहे. 12 प्रवाश्यांचा मृत्यू जागेवर झाला आहे. 10 जणांना खोपोलीत तर एकाला खाजगी रूग्णलयात दाखल केलं आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. मृतांच्या कुटुंबियांना मदत केली गेली आहे. तसंच जखमींवर उपचार करण्याचे आदेश दिले आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. दरम्यान, या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे.

Published on: Apr 15, 2023 12:29 PM
Nana Patole : अमरावतीत झालेल्या काँग्रेस-भाजप युतीवर प्रदेशाध्यक्ष नाखूश; काय होणार युतीचं?
सप्तशृंगी गडावर जाताय? भोजन व्यवस्थेसह सुरू झालेल्या ‘या’ नव्या सुविधा माहितीये का?