नागपूरचे बस स्टॉप एअरपोर्ट सारखे बनवू; देवेंद्र फडणवीस यांचा शब्द
Nagpur News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांना शब्द दिलाय. नागपूरचे बस स्टॉप एअरपोर्ट सारखे बनवू, असं ते म्हणाले आहेत. पाहा सविस्तर...
नागपूर : विदर्भातील 6 उड्डाणपुलाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण पार पडलं. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित होते. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांना शब्द दिलाय. नागपूरचे बस स्टॉप एअरपोर्ट सारखे बनवू, असं ते म्हणाले आहेत. पुढच्या वर्षीच्या शेवटपर्यंत 50 ब्रिज तयार करणार. यंदाच्या बजेटमध्ये नागपूरसह विदर्भाला मोठा निधी मिळाला आहे. त्यामुळे सगळे रस्ते सिमेंटचे बनवू, असं फडणवीस म्हणाले आहेत. या आधीच काम झालं असतं. मात्र उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाखाली सरकार आलं. त्यांनी कॉस्ट शेयरिंग करणार नाही, अशी भूमिका घेतली होती. सरकार आल्यानंतर आता पुन्हा कॉस्ट शेयरिंगचा निर्णय घेतला. त्यामुळे आता विकासकामं गतीनं होतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
Published on: Apr 15, 2023 03:43 PM