नागपूरमध्ये आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा; सुरक्षाव्यवस्था कशी आहे?
MVA Vajramuth Sabha Security System : महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेसाठी कशी तयारी? सुरक्षाव्यवस्था कशी करण्यात आली आहे? पाहा व्हीडिओ...
नागपूर : महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आज नागपूरमध्ये होतेय. या सभेच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लागण्यास सुरूवात झाली आहे. दर्शन कॉलनी मैदानात होणाऱ्या सभेसाठी 500 पेक्षा अधिक पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. 100 पोलीस अधीकारी असणार बंदोबस्तामध्ये तैनात असणार आहेत. आज संध्याकाळी वज्रमूठ सभा होणार आहे. त्यामुळे या वज्रमूठ सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सभेच्या व्यासपीठासमोर भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. शेख ईसाक या कलाकाराने महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेसाठीची रांगोळी साकारली आहे. सकाळी सात वाजता ही रांगोळी काढण्याचं काम सुरू झालं. रांगोळीत एकूण सहा रंगाचा वापर करण्यात आला आहे.
Published on: Apr 16, 2023 12:16 PM