Nagpur Updates : आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर

| Updated on: Mar 24, 2025 | 2:30 PM

Nagpur Violence Mastermind Fahim Khan News : नागपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खान याच्या घरावर आज नागपूर पालिकेने कारवाई केली आहे.

नागपूर हिंसाचार प्रकरणातील म्होरक्या फहीम खान याच्या घरावर आज नगपूर पालिकेने बुलडोजर फिरवलं आहे. पालिकेच्या अतिक्रमण पथकाने ही तोडक कारवाई केलेली आहे. फहीम खान याच्या घरचा अतिक्रमण केलेला भाग हा पाडण्यात आलेला आहे.

नागपूरमध्ये आठ दिवसांपूर्वी दोन गटात तूफान राडा झाला होता. या घटनेत जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आलेली होती. त्यात काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले होते. या संपूर्ण राडा प्रकरणात पोलिसांनी फहीम खान याला मुख्य सूत्रधार म्हणून ताब्यात घेतलेलं आहे. सध्या न्यायालयीन कोठडीत फहीम खानची रवानगी करण्यात आलेली आहे. त्यानंतर आज नागपूर पालिकेने आरोपी फहीम खान याच्या घरावर बुलडोजर फिरवलं आहे.

दरम्यान, शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नागपूर राड्यात झालेल्या नुकसानीची भरपाई ही आरोपींकडून वसूल केली जाईल असे संकेत दिलेले होते. तसंच यापैकी कोणाचं बेकायदा बांधकाम असेल तर ते पाडलं जाईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले होते.

Published on: Mar 24, 2025 02:30 PM
Udhav Thackeray : हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला प्रश्न
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, ‘ठाणे की रिक्षा’ला ‘भांडूप का भामटा’नं पलटवार