Nagpur Violence : नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?
Nagpur Violence Accuse Updates : नागपूर हिंसाचार प्रकरणात फहीम खाननंतर आता सय्यद असीम अलीचं नाव चर्चेत आलं आहे. या राड्यानंतर आता सय्यद अलीच्या नावाची चर्चा असल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
नागपूर हिंसाचार प्रकरणात फहीम खाननंतर आता सय्यद असीम अलीचं नाव चर्चेत आलं आहे. या राड्यानंतर आता सय्यद अलीच्या हालचालींवर देखील पोलिसांकडून लक्ष ठेवलं जाणार आहे. सय्यद अलीला एका हिंदू नेत्याच्या हत्येच्या प्रकरणात देखील अटक करण्यात आली होती. पोलिसांनी सय्यद असीम अली याच्या नागपूर येथील घरी चौकशी केली. मात्र तो घरी नसल्याची माहिती समोर आली आहे.
सोमवारी रात्री नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणात आता पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केलेली आहे. फहीम शेख याला पोलिसांनी काल ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून अनेक खुलासे होत असतानाच आता या घटनेत आणखी एक नाव पुढे आलं आहे. सय्यद असीम अली याचं देखील नाव या घटनेत येत असल्याने पोलिस त्याच्या हालचालींवर नजर ठेऊन आहेत. याआधी देखील सय्यद असीम अलीचं नाव एक नेत्याच्या हत्येप्रकरणात पुढे आलं होतं. कमलेश तिवारी यांनी मोहोम्मद पैगंबरांविषयी आक्षेपहार्य विधान केलं होतं. त्यामुळे कमलेश तिवारी यांची जीभ कापणाऱ्याला बक्षिसाची घोषणा सय्यद असीम अलीने केली होती. त्यानंतर 2019मध्ये कमलेश तिवारी यांची लखनौमध्ये हत्या करण्यात आली होती. त्यांच्या मारेकऱ्यांनी सय्यद असीम अलीसोबत बक्षिसासाठी संपर्क देखील साधला होता. त्यावेळी नागपूर एटीएसने सय्यद असीम अलीला अटक करून उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं.