पटोले म्हणाले, कसब्यात आमचा विजय झालाय…फडणवीस यांनी सभागृहातच रोखलं, जरा थांबा, कारण…

| Updated on: Mar 02, 2023 | 1:19 PM

Maharashtra, Maharashtra Assembly By Election 2023 : कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे नेते रविंद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. रविंद्र धंगेकर यांना 73, 194 मतं मिळाली आहेत. तर हेमंत रासने यांना कसब्यातील जनतेनं 62, 244 मतं दिली आहेत. पाहा व्हीडिओ...

मुंबई : कसब्यातील पोटनिवडणुकीत रविंद्र धंगेकर यांचा विजय झाला. याचा संदर्भ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत दिला. यावेळी बोलताना धंगेकर यांचा विजय झाला आहे. आता सभागृहात त्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी विनंती केली. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. मी नाना पटोले यांचं अभिनंदन करतो. जो निकाल जनता देईल तो स्विकारला पाहिजे. थोडावेळ थांबा पिंपरी-चिंचवडचाही निकाल येईल, तोही स्विकारावाच लागेल, असं फडणवीस म्हणाले.

Published on: Mar 02, 2023 01:19 PM
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री खोक्यांसकट पुण्यात ठाण मांडून होते, पण तरिही पराजयच!; संजय राऊत यांचा घणाघात
निवडणूक आयोग सरकारच्या हातातलं बाहुलं, त्यांच्याकडून कसली न्यायाची अपेक्षा करणार; संजय राऊत यांची आक्रमक प्रतिक्रिया