Nana Patole | भाजपने अपंग सरकार आणले, कोणत्याही जिल्ह्यात पालकमंत्री नेमला नाही
हे स्वतःसाठी जगतात अशी टीका काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
ज्याप्रमाणे शेतकऱ्यांवर संकट आलेली आहे. त्याची पाहणी मी जाऊन करणार आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आहे पण बीजेपी ने मात्र सुलतानी संकट निर्माण केला आहे. त्याचा परिणाम तिथले लोक काय भोगत आहेत. याची पाहणी करायला मी जात आहे. राज्यात सरकारच नाही प्रशासन ठप्प पडलाय महाराष्ट्र वाऱ्यावर सोडला आहे. दोन मंत्री महाराष्ट्रातले आणि भाजप स्वतःच्या स्वार्थासाठी तेवढाच विचार भाजप करते .जनतेचा यांना काही देणंघेणं नाही, आम्ही जनतेसाठी आहोत देशासाठी आहोत असा आव आणतात. मात्र यांचा त्याच्याशी काही संबंध नाही. हे स्वतःसाठी जगतात अशी टीका काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.