Nana Patole | ‘अमृता फडणवीस आमच्या सुनबाई त्यावर प्रतिक्रिया देणार नाही’
अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) आमच्या सुनबाई त्यावर प्रतिक्रिया देणार नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले आहेत. टिळक भवनात आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलं होतं. त्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर टीका केली होती.
अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) आमच्या सुनबाई त्यावर प्रतिक्रिया देणार नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले आहेत. टिळक भवनात आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलं होतं. त्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर टीका केली होती. तसेच काही मंत्र्यांवरही टीप्पणी केली होती. त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर जोरदार निशाणा साधला आहे. नॉटी नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले अशा आशयचे जळजळीत ट्विट अमृता फडणवीसांकडून करण्यात आलं आहे. त्याचबरोबर अमृता फडणवीसांनी एक प्रश्नपत्रिका दिली आहे. थोडक्यात उत्तर द्यावे 50 मार्क्स, असे प्रश्नपत्रिकेला हेडर देण्यात आलं आहे, त्यावरूनच वर्षा गायकवाड यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय.