Nana Patole : 10 लाखांचा सुट, 1 लाख 5 हजाराचा चष्मा, 8 हजार कोटींचं विमान वापरणाऱ्या फकिरावरही बोला; नाना पटोलेंची भाजपावर टीका

| Updated on: Sep 10, 2022 | 5:08 PM

राहुल गांधी यांच्या यात्रेला मिळत असलेल्या वाढत्या प्रतिसादामुळेच भाजपाला (BJP) धडकी भरली असून टी-शर्टच्या किंमतीसारखे टुकार मुद्दे काढावे लागत असल्याची टीका पटोले यांनी केली आहे.

मुंबई : 10 लाखांचा सुट, 1 लाख 5 हजाराचा चष्मा आणि 8 हजार कोटींचे विमान वापरणाऱ्या फकीर मोदींवरही बोला, असा सवाल सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपाला केला आहे. तर या यात्रेने भाजपाला धडकी भरली असून यावर जनतेचे लक्ष जाऊ नये, म्हणून हा केलेला प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले आहेत. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी (Rahul Gandhi)  हे सर्वसामान्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत. त्यामुळे जनता कोणत्या समस्येने त्रस्त आहे, हे देखील निदर्शनास येत आहे. शिवाय जनतेशी थेट संवाद होत असल्याने यात्रेमध्ये सहभागी होण्याचे प्रमाणही वाढत आहे. वाढत्या प्रतिसादामुळेच भाजपाला (BJP) धडकी भरली असून टी-शर्टच्या किंमतीसारखे टुकार मुद्दे काढावे लागत असल्याची टीका पटोले यांनी केली आहे.

Published on: Sep 10, 2022 05:05 PM
Neelam Gorhe : काही लोक राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करतात, त्यावर काय बोलणार? नीलम गोऱ्हेंचा नितेश राणेंना टोला
Yakub Menon: याकूब मेनन यांच्या कबरीवरील सजावटीवरून भाजप -शिवसेना आमनेसामने