भाजप- मनसे युतीच्या चर्चेवर नाना पटोलेंची टीका
आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजप आणि मनसे या दोन पक्षात युती होऊ शकते, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आणि मनसेवर निशाणा साधला आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजप यांची महापालिका निवडणुकीसाठी युती होणार असल्याची चर्चा रंगत आहे. दोनही पक्षांकडून अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र मनसे आणि भाजप युतीच्या चर्चेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टोला लगावला आहे. भाजप आणि मनसे युती झाल्यास त्याचा आम्हाला काही फरक पडणार नाही. राज ठाकरे हे सुपारीबाज असल्याचे एकदा फडणवीस म्हणाले होते, मग आता राज ठाकरे यांच्यात नेमका काय बदल झाला असा सवा पटोले यांनी केला आहे.