“ऑपरेशन लोटसच्या नावाखाली भाजप चिखल करतंय”, नाना पटोले यांचा घणाघात
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या शिंदे-फडणवीस सरकारसोबत जायच्या निर्णयाने राज्यातील राजकारणाची समीकरण बदलली. आता राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं महायुतीचं सरकार आहे. याच पार्श्वभूमीवर आजा काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.अजित पवार यांच्या शिंदे-फडणवीस सरकारसोबत जायच्या निर्णयाने राज्यातील राजकारणाची समीकरण बदलली. आता राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं महायुतीचं सरकार आहे. याच पार्श्वभूमीवर आजा काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मुळात हा भूकंप नाही तर नाट्य आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले, तेव्हापासून हे नाट्य सुरु झालं. ऑपरेशन लोटसच्या नावाखाली भाजप चिखल करत आहे. भाजप घाणेरडं राजकारण करत आहे. आधी ईडीची भीती दाखवायची मग त्याच नेत्याला भाजपमध्ये घ्यायचं हा भाजपचा अजेंडा जनतेसमोर आला आहे. पण…” नेमकं नाना पटोले काय म्हणाले यासाठी पाहा यासंदर्भातील व्हिडीओ…