“महाराष्ट्रात पूरपरिस्थिती, मुख्यमंत्र्यांचं दिल्लीला जाणं भूषणावह नाही…निवडणुकीनंतर सत्तेबाहेर बसतील”, काँग्रेसचा हल्लाबोल

| Updated on: Jul 23, 2023 | 7:54 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी रात्री अचानक दिल्लीला रवाना झाले. शिंदे यावेळी कुटुंबासह दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते. त्यांनी शनिवारी कुटुंबियांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे

भंडारा, 23 जुलै 2023 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी रात्री अचानक दिल्लीला रवाना झाले. शिंदे यावेळी कुटुंबासह दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते. त्यांनी शनिवारी कुटुंबियांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, “महाष्ट्रावर पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पूरामुळे अनेक लोकांचा जीव धोक्यात आलेला आहे. अशावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोदी आणि शाहा यांचे हस्तक समजून त्यांना भेटाला गेले हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. त्यामुळे किती दिवस मुख्यमंत्री राहतील किंवा नाही राहतील, पण ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुका पार पडतील, त्यावेळी हे सर्व सत्तेच्या बाहेर जातील.”

Published on: Jul 23, 2023 07:54 AM
‘चित्रपट संपायला आला आणि हे पोहोचले’; इर्शाळवाडीच्या भेटीवरून भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना
‘खासगी दुध संघानी शेतकऱ्यांवर दरोडाच घातलाय’; सदाभाऊ खोत यांचा खासगी दुध संघाना इशारा