“ईडी सरकार महाराष्ट्राची अधोगती करतंय”, नाना पटोलेंची टीका
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. काय म्हणालेत पाहा...
मुंबई : महाराष्ट्र सरकार गुजरातच्या आशीर्वादाने आलेले आहे. महाराष्ट्राची अधोगती करणारं हे शिंदे सरकार (Eknath Shinde) आहे. ईडी ही भाजपमुळे महाराष्ट्रात आलेली आहे आणि महाराष्ट्राचा नुकसान करत आहे. महाराष्ट्रातील योजना लुटून गुजरातला देण्यात येत आहेत. सरकार ईडीचे सरकार आहे. हे सरकार देशाचा विकास करू शकत नाही हे आता सिद्ध झालं आहे, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
Published on: Sep 27, 2022 03:59 PM