एकनाथ शिंदे यांची मानसिकता खराब, त्यांना सत्तेची गुर्मी!, नाना पटोले असं का म्हणाले?, पाहा…
एकनाथ शिंदे यांची मानसिकता खराब, त्यांना सत्तेची गुर्मी आहे, असं नाना पटोले म्हणालेत.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट मॅच भारताने जिंकल्यावर प्रतिक्रिया दिली. त्यावेळी बोलताना आम्हीसुद्धा साडे तीन महिन्यांपूर्वी एक मॅच जिंकलो आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. त्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांची मानसिकता खराब असेल आणि सत्तेची गर्मी असेल तर यावर टीका प्रतिक्रिया देणे योग्य नाही , असं पटोले म्हणाले. सरकारने जनेतेच्या हितासाठी काम करावं. मात्र सध्या महाराष्ट्रातील सरकारने विकास कामं थांबवली आहेत. सरकार हेकेखोरपणाने वागत आहे. त्यामुळे आता जनताच ठरवेल कोण पाकिस्तान आणि कोण भारत अशी प्रतिक्रिया नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे.
Published on: Oct 24, 2022 03:50 PM