कसबा पोटनिवडणूक बिनविरोध होणार का? नाना पटोलेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं, म्हणाले…

| Updated on: Feb 06, 2023 | 12:07 PM

भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोले यांना आव्हान दिलं. त्याला नाना पटोले यांनी उत्तर दिलं आहे. पाहा..

भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोले यांना आव्हान दिलं. टिळकांच्या घरात उमेदवारी देतो. तुम्ही निवडणूक बिनविरोध करता का?, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या या आव्हानावर माध्यमप्रतिनिधींनी नाना पटोले यांना प्रश्व विचारला तेव्हा त्यांनी स्पष्टपणे बोलणं टाळलं. कुणाला उमेदवारी द्यायची कुणाला नाही हा त्यांच्या पक्षाने ठरवावं, असं नाना पटोले म्हणाले. दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये आम्ही जगताप यांच्या कुटुंबातीलच उमेदवार दिली आहे. मग तिकडे का बिनविरोध तुम्ही निवडणूक बिनविरोध केली नाही, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोलेंना निवडणूक बिनविरोध करण्याचं आव्हान दिलं आहे.

मोठ्या शक्तीप्रदर्शनानंतर हेमंत रासनेंचा उमेदवारी अर्ज दाखल; पाहा…
आमच्या ‘कोट’चा विचार त्यांनी करू नये, देवेंद्र फडणवीस यांचा अजित पवार यांना सल्ला