अखेर काँग्रेसचं ठरलं! कसबा पोटनिवडणुकीत ‘या’ नेत्याला उमेदवारी
कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार याची उत्सुकसा ताणली गेली होती. आज अखेर काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केलाय. पाहा...
कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार याची उत्सुकसा ताणली गेली होती. रविंद्र धंगेकर यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळमार असल्याचं वारंवार सांगितलं. तर पुण्यातील काँग्रेसचे काही नेते नाराज आहे. आज अखेर काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केलाय. रविंद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे. नाना पटोलेंनी मला अर्ज भरण्यासाठी तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असं रविंद्र धंगेकर यांनी काही वेळाआधी सांगितलं होतं. त्यानंतर आता अखेर काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केलंय. रविंद्र धंगेकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Published on: Feb 06, 2023 10:39 AM