“कोणाच्या पक्षात काय चाललंय…”, अजित पवार-शरद पवार भेटीवर नाना पटोले यांची प्रतिक्रिया!
रविवारी अजित पवार गटाने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. अधिवेशनाच्या एक दिवस आधीच राष्ट्रवाचे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला आल्याने अनेक तर्क-वितर्क काढले जात आहेत. या भेटीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई, 17 जुलै 2023 | रविवारी अजित पवार गटाने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे आणि आदिती तटकरे आदी नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. अधिवेशनाच्या एक दिवस आधीच राष्ट्रवाचे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला आल्याने अनेक तर्क-वितर्क काढले जात आहेत. या भेटीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “कोणाच्या पक्षात काय चाललं आहे, आम्हाला बघण्याची गरज नाही. भाजपच्या विरोधातील पक्षाला आम्ही सोबत घेवून चालू.”
Published on: Jul 17, 2023 10:36 AM