“मुख्यमंत्री शिंदे गारूडी, तर उपमुख्यमंत्री फडणवीस…”, सापनाथ-नागनाथ टीकेवरुन काँग्रेसचा हल्लाबोल

| Updated on: Aug 03, 2023 | 2:43 PM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. कितीही सापनाथ-नागनाथ एकत्र आले, तरी मोदींना पराभूत करू शकणार नाहीत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. याला आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. कितीही सापनाथ-नागनाथ एकत्र आले, तरी मोदींना पराभूत करू शकणार नाहीत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. याला आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “राज्याचे मुख्यमंत्री गारूडी आहेत, तर उपमुख्यमंत्री फेकण्यात एक्सपर्ट आहेत. दुसऱ्यांना नागनाथ आणि सापनाथ म्हणणं याचा परिणाम काय होतो, हे उत्तर प्रदेशात पाहिलं आहे. तसेच, आता महाराष्ट्रात होणार आहे. त्यामुळे स्वत:चं घोषवाक्य स्वत:ला लावायचं, असं त्यांचं मत होत का? आम्ही संविधानाचे रक्षक आणि जनतेच्या हिताचे लढाई लढणारे लोक आहोत.”

Published on: May 26, 2023 08:33 AM
एकनाथ शिंदे आंबेडकर यांचा सल्ला स्विकारणार? संजय गायकवाड म्हणतात, प्रकाश आंबेडकर हे मोठे नेते…!
जेजुरीच्या मार्तंड देवसंस्थान समितीमधील वाद चिघळला, विश्वस्त समितीत वाद, कारण काय?