“प्रकाश आंबेडकर आणि मविआचा संबंध नाही”, काँग्रेस नेत्याचं वक्तव्य
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर नेहमीच महाविकास आघाडीत बिघाडी होणार यावर वक्तव्य करत असतात. यावेळी देखील त्यांनी आपल्या भाषणात मविआवर टीका केली आहे. मविआत बापात बाप नाही, लेकात लेक नाही, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. त्यांच्या या टीकेवर मविआच्या नेत्यांनी उत्तर दिलं आहे.
नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर नेहमीच महाविकास आघाडीत बिघाडी होणार यावर वक्तव्य करत असतात. यावेळी देखील त्यांनी आपल्या भाषणात मविआवर टीका केली आहे. मविआत बापात बाप नाही, लेकात लेक नाही, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. त्यांच्या या टीकेवर मविआच्या नेत्यांनी उत्तर दिलं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी “आमच्याबाबत प्रकाश आंबेडकर यांची नेहमीच अशी मतं राहिली आहेत”,असं म्हणाले आहेत. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडकर यांना प्रत्युत्तर दिलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचा मविआशी काही संबंध नाही.त्याबाबत तसा प्रस्ताव नाही.आम्हाला त्याबाबत बोलायचे नाही, असं नाना पटोले म्हणाले.
Published on: Jun 04, 2023 12:25 PM