पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये जाणार? नाना पटोले यांच्या ‘त्या’ विधानाने चर्चांना उधाण
पंकजा मुंडे यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस हायकमांडची भेट घेतल्याचीही चर्चा आहे. या चर्चेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई: भाजप नेत्या पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. पंकजा मुंडे यांचे राजकीय विरोधक असलेले धनंजय मुंडे हे भाजपसोबत आल्याने आता राजकीय समीकरण बदललं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये जाणार का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यात पंकजा मुंडे यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस हायकमांडची भेट घेतल्याचीही चर्चा आहे. या चर्चेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “जर त्यांची भेट झाली असेल आणि काँग्रेसमध्ये येण्यास त्या उत्सुक असतील तर त्यांचं स्वागत आहे.”
Published on: Jul 07, 2023 10:52 AM