दिल्लीत काँग्रेसच्या हालचाली वाढल्या, बैठकीनंतर नाना पटोले म्हणाले…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीच्या घटनेची काँग्रेस हायकमांडने गंभीर दखल देखील घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. काँग्रेस हायकमांडने मंगळवारी दिल्लीत महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सर्व दिग्गज नेत्यांची बैठक बोलावली. या बैठकीत नेमकं काय घडलं याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.
नवी दिल्ली : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर काँग्रस पक्ष आता सतर्क झाला आहे. त्यात राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता काँग्रेस पक्षात फूट पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण दुसरीकडे महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी या चर्चांचं खंडन केलं आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीच्या घटनेची काँग्रेस हायकमांडने गंभीर दखल देखील घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. काँग्रेस हायकमांडने मंगळवारी दिल्लीत महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सर्व दिग्गज नेत्यांची बैठक बोलावली. या बैठकीनंतर राहुल गांधी सप्टेंबरमध्ये महाराष्ट्र दौरा करतील. महाराष्ट्रातील सर्व विभागांमध्ये या सभा घेण्यात येणार आहेत, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.
Published on: Jul 12, 2023 07:49 AM