महाविकास आघाडी टिकणार का? नाना पटोले स्पष्टच बोलले…
महाविकास आघाडीतील नेत्यांच्या विविध विधानांमुळे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वक्तव्य केलं आहे. 'कुणी चुकीचा अर्थ लावत असेल तर, त्याला आमचा नाईलाज आहे.
भंडारा: महाविकास आघाडीतील नेत्यांच्या विविध विधानांमुळे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वक्तव्य केलं आहे. ‘कुणी चुकीचा अर्थ लावत असेल तर, त्याला आमचा नाईलाज आहे. पण मूळ प्रश्न आहे की, अजून आम्ही काहीच बोललो नाही. माध्यमाच्या चुकीच्या बातम्या आणि त्याचा चुकीचा अर्थ लावून गैरसमज निर्माण केला जात असेल, तर ते चुकीचे आहे. जागा वाटपाचं बोलणं झालेलं नाही, त्यासाठी कमिटी बनणार आहे. राहिलं लोकल बॉडी निवडणूक बद्दलची भूमिका आजची नाही, ती वर्षभरापूर्वीच आहे, ती सर्वांचीच आहे, त्यामुळं कुणी गैरसमज करून घेवू नये, महाविकास आघाडी पुढे चालेल आणि आम्ही टिकून राहू’, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडाऱ्यात व्यक्त केला.
Published on: May 17, 2023 04:20 PM