‘टोलच्या माध्यमातून लुटत होते म्हणुनच’, नाना पटोले यांनी सरकारवर साधला निशाणा
2014 मध्ये ज्या लोकांनी टोल मुक्तीची घोषणा केली त्यांनीच आता टोल वाढवले. अनेक ठिकाणी टोल चालू केले. ज्या पद्धतीने 2014 मध्ये महाराष्ट्र आणि देश टोल मुक्त करण्याच्या घोषणा भाजप नेत्यांनी केल्या. तेच आता केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहेत.
भंडारा : 13 ऑक्टोबर 2023 | विधानसभा अध्यक्ष यांनी शेड्युलप्रमाणे जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पूर्ण करायला हवी. वेळेत आणि नियमाच्या अधीन राहून करावे अशी आमची सूचना आहे. पण, सरकार हास्यकल्लोळ करून मनोरंजन निर्माण करुन जनतेच्या प्रश्नाला दुर्लक्षित करीत आहे अशी टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय. आमदार अपात्रते संदर्भात सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले ते फक्त विधिमंडळाचे अध्यक्ष यांच्याबाबत नाही तर सरकारच्या व्यवस्थेबाबत हे ताशेरे आहेत. महाराष्ट्र हे टोलमुक्त राज्य असले पाहिजे. 14 टोल नाके बंद करून चालणार नाही. तर, महाराष्ट्र हे टोल मुक्त राज्य पाहिजे ही काँग्रेसची भुमिका आहे. एखाद्याच्या घरी जाऊन सरकारने त्याच्याशी सटगाठ करणे म्हणजे ही सरकार टोलच्या माध्यमातून जनतेला लुटत होती. आता त्यांचे कॅमेरे लागतील ही काय साठगाठ आहे, असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला