घर फुटण्याचं दुःख तुम्हालाही कळेल, नाना पटोले यांचा इशारा कुणाला?

| Updated on: Jan 13, 2023 | 2:08 PM

डॉ. सुधीर तांबे यांनी पक्षासोबत फसवेगिरी केली आहे. त्यांच्यावर जी काही कारवाई करायची त्याचा निर्णय हायकमांड घेईल.

मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी कॉंग्रेसने डॉ. सुधीर तांबे ( SUDHIR TAMBE ) यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी उमेदवारी अर्ज न भरता मुलगा सत्यजित याच्यासाठी माघार घेतली. सत्यजित तांबे ( SATYJIT TAMBE ) यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. तर, भाजपने येथे उमेदवार दिलेला नाही.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( NANA PATOLE ) यांनी यावर भाष्य करताना कॉंग्रेस पक्षासोबत ज्यांनी बंडखोरी केली त्यांना आम्ही पाठिंबा देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. झाला प्रकार पक्षश्रेष्ठीच्या कानावर घातला आहे. या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढू. तांबे यांनी पक्षासोबत फसवेगिरी केली आहे.

भाजप सध्या दुसऱ्यांची घरे फोडण्याचे काम करत आहे. आपला आनंद साजरा करत आहे. पण, जेव्हा त्यांचे घर फुटेल तेव्हा घर फुटण्याचे दुःख त्यांना कळेल, अशी टीकाही त्यांनी केली.

Published on: Jan 13, 2023 02:08 PM
Urfi Javed : उर्फीनं नीट कपडे घालूनच प्रकरण मिटवावं, चित्रा वाघ यांचा सल्ला
संजयकाका-अमित देशमुखांमध्ये जुगलबंदी; ‘त्या’ ऑफरवर वार-पलटवार