Jayant Patil: नाना पाटोले यांचा आरोप चुकीचा आहे, जयंत पाटील यांनी सोडले मौन
स्थानिक नेत्यांचे कुणाशी पटतं तर कुणाशी पटत नाही किंवा टोकाची मतमतांतरे कुणाची झाली आहेत याचादेखील दुसर्या बाजूने विचार करून घेण्याची आवश्यकता आहे. त्याची माहिती घेऊ.
मुंबई – नाना पटोले यांच्या आरोपावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil)यांनी मौन सोडले आहे. नाना पाटोले यांचा आरोप चुकीचा आहे. राज्यात येणार्या काळात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक नेतृत्वाने सर्वांना एकत्र बसवून महाविकास आघाडी (Mahaviksa Aghadi) एकत्र रहावी असे प्रयत्न करणे अपेक्षित होते. गोंदियामध्ये नाना पटोले म्हणतात त्याप्रमाणे वेगळं काम झालं असेल तर त्याची नोंद पक्ष घेईल, असेही जयंत पाटील म्हणाले. स्थानिक नेत्यांचे कुणाशी पटतं तर कुणाशी पटत नाही किंवा टोकाची मतमतांतरे कुणाची झाली आहेत याचादेखील दुसर्या बाजूने विचार करून घेण्याची आवश्यकता आहे. त्याची माहिती घेऊ. नाना पटोले (Nana Patole )यांनी संपर्क साधला होता. मात्र स्थानिकदृष्टया मनं दुभंगलेली असल्यामुळे अडचणी निर्माण होत असाव्यात कदाचित याबाबतीत तपशीलात जाऊ असेही जयंत पाटील यांनी सांगितले.