मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात ऊर्जा विभागाचा काहीही संबंध नाही, Nana patole यांची माहिती
आपण ऊर्जा विभागाच्या विरोधात पत्र लिहिल्याची बातमी पूर्णपणे असत्य आणि चुकीची आहे. आपले पत्र हे खनिकर्म महामंडळातील टेंडरबाबत आहे. या महामंडळाचा ऊर्जा विभागाशी काहीही संबंध नाही, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.
सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेनेकडे असलेल्या महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळानं राबवलेल्या निविदा प्रक्रियेवर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला आहे. यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय. महाजनको कंपनीला कोळसा पुरवणाऱ्या कोळसा वॉशिंगच्या कंत्राटाच्या निविदेवर पटोले यांनी आक्षेप घेतला आहे. संजय हरदानी चालवत असलेल्या रुखमाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी गैरमार्गाने पात्र ठरल्याचा आक्षेप पटोले यांनी घेतला आहे. दरम्यान, नाना पटोले यांनी ऊर्जा विभागाच्या विरोधात पत्र लिहिल्याची बातमी व्हायरल होत होती. त्यावर खुद्द पटोले यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. आपण ऊर्जा विभागाच्या विरोधात पत्र लिहिल्याची बातमी पूर्णपणे असत्य आणि चुकीची आहे. आपले पत्र हे खनिकर्म महामंडळातील टेंडरबाबत आहे. या महामंडळाचा ऊर्जा विभागाशी काहीही संबंध नाही, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.