Nanded farmers : पीकविम्याच्या प्रश्नी नांदेडमधील शेतकरी आक्रमक, आंदोलन करण्याचा इशारा
कंपन्यांना पीकविमा मंजूर करण्याचे आदेश द्यावेत, तसेच शेतीसाठी विनाखंडित विद्युत पुरवठा करावा, अशी मागणी या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने केली आहे. आठ दिवसांत मागण्या मंजूर झाल्या नाहीत, तर तीव्र आंदोलन (Protest) उभारण्याचा इशारा संघर्ष समितीने दिला आहे.
नांदेड : नांदेडमध्ये पीकविम्याची (Crop insurance) पंचवीस टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी पीकविमा कंपनीस आदेश द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. देगलूर इथल्या शेतकरी कष्टकरी संघर्ष समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची (Collector) भेट घेत ही मागणी केली. गेल्या पंचवीस दिवसापासून पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील पिके वाळून गेली आहेत. तर सुरुवातीला अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना दुबार तिबार पेरणी करावी लागली होती. पिके अक्षरश: कुजून गेली होती. अतोनात नुकसान शेतकऱ्यांचे झाले. त्यामुळे कंपन्यांना पीकविमा मंजूर करण्याचे आदेश द्यावेत, तसेच शेतीसाठी विनाखंडित विद्युत पुरवठा करावा, अशी मागणी या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने केली आहे. आठ दिवसांत मागण्या मंजूर झाल्या नाहीत, तर तीव्र आंदोलन (Protest) उभारण्याचा इशारा संघर्ष समितीने दिला आहे.