माहूर शहरात बनावट नोटा; सलग दोन दिवसांत सापडल्या इतक्या हजारांच्या नोटा

| Updated on: Mar 26, 2023 | 9:02 AM

काल 78 हजाराच्या नोटा बौद्ध भूमी परिसरात सापडून आल्या होत्या तर आज पुसद रोड वरील उखडी घाटात सुमारे 9 हजार पांचशे रुपयांच्या नोटा सापडल्या

नांदेड : काही दिवसांपुर्वी नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. अवकाळी आणि गारपिटीमुळे नांदेड उजेडात येत होतं. याचदरम्यान आता नव्या कारणामुळे नांदेड पुन्हा एकदा उजेडात आलं आहे. येथील माहूर शहरात गेल्या दोन दिवसात बनावट नोटा सापडून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. काल 78 हजाराच्या नोटा बौद्ध भूमी परिसरात सापडून आल्या होत्या तर आज पुसद रोड वरील उखडी घाटात सुमारे 9 हजार पांचशे रुपयांच्या नोटा सापडल्या. आज उखडी घाटात या नोटा विक्रम राठोड यांना सापडून आल्या. याप्रकरणी पोलिसांनी विक्रम राठोड राठोड यांचा जवाब नोंदवून घेत नोटा जप्त केल्या आहे. लागोपाठ दोन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी बनावट नोटा सापडून आल्याने शंका-कुशंकेला उधाण आले आहे.

Published on: Mar 26, 2023 09:02 AM