VIDEO | निवृत्त शेतकऱ्याची कमाल, छंद म्हणून चक्क माळरानावर फुलवली आमराई
एका सेवानिवृत्त शिक्षकाने चक्क माळरानावर आमराई फुलवली आहे. (Retired Teacher Plants Mango)
नांदेड : आंबा म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. नांदेडच्या देगलूर तालुक्यातील काठेवाडी गावात एका सेवानिवृत्त शिक्षकाने चक्क माळरानावर आमराई फुलवली आहे. गणपती निवळे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. छंद म्हणून केलेल्या या आमराईला चांगलाच बहर आला आहे. (Retired Teacher Plants Mango in farm)
गणपती निवळे यांनी काही वर्षांपूर्वी शिक्षकी पेक्षातून निवृत्ती स्विकारली. त्यानंतर त्यांनी छंद म्हणून शेती करण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी पाच एकरमध्ये दसेरी आणि केशर जातीच्या आंब्याची रोप लावली. छंद म्हणून लावलेल्या या आमराईला चांगलाच बहर आला आहे. या आंब्याच्या उत्पादनातून चांगले उत्पन्न होईल, असे या शेतकऱ्याने सांगितलंय.