सलग पावसाचा ‘येथेही’ फटका डोंगरालाच पडल्या भेगा; भुस्खलनचा मोठा धोका
कोकणासह राज्यात पडणाऱ्या पावसामुळे आता पेरण्यांना गती आली आहे. तर अनेक ठिकाणी पावसामुळे पाणी तुंबू लागले आहे. राजधानी मुंबईत तर पाणीपाणी झालं आहे. तर अनेक रस्त्यांवर पाणी येत असल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
चिपळूण : पाऊस कधी येणार कधी पडणार अशा प्रश्नांना आता आठवड्याभरात पडणार्या पावसाने उत्तर दिलं आहे. कोकणासह राज्यात पडणाऱ्या पावसामुळे आता पेरण्यांना गती आली आहे. तर अनेक ठिकाणी पावसामुळे पाणी तुंबू लागले आहे. राजधानी मुंबईत तर पाणीपाणी झालं आहे. तर अनेक रस्त्यांवर पाणी येत असल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याचदरम्यान चिपळूण तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने येथे नांदिवसे गावातील डोंगराला अशा भेगा पडल्या आहेत. सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या नांदिवसे गावात सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे डोंगराला भेगा पडल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दोन दिवसांपासून येथे भूस्खलन होण्याच्या घटना समोर येत आहेत. तर पडलेल्या भेगा अधिक होत असून सध्या भूस्खलनाची तीव्रता वाढली आहे.