मिरचीच्या आगारात मिरचीचा पूर; आवक वाढली अन् उलाढाल ही; आतापर्यंत 105 कोटी रूपयांची…

| Updated on: May 17, 2023 | 9:48 AM

नंदुरबार बाजारपेठेत मिरची विक्रीतून विक्रमी उलाढाल झाली असून आतापर्यंत 105 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर मे अखेरपर्यंत हा हंगाम सुरू राहणार आहे.

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा हा मिरचीचं आगार म्हणून ओळखला जातो. येथे दरवर्षी मिरचीच्या नवीन नवीन विक्रम होत आहे. गेल्या अनेक वर्षाच्या तुलनेत यावर्षी चांगली मिरचीची आवक वाढली आहे. नंदुरबार बाजारपेठेत मिरची विक्रीतून विक्रमी उलाढाल झाली असून आतापर्यंत 105 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर मे अखेरपर्यंत हा हंगाम सुरू राहणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून नंदुरबार बाजारपेठेत मिरचीची आवक विक्रमी वाढत चालली आहे. गेल्या काही वर्षापासून उलाढालीच्या आकडा देखील कोट्यवधीचा घरात राहिला आहे. मात्र या हंगामात 105 कोटीपर्यंत उलाढाल झाली आहे. मिरची हंगामाच्या सुरुवातीला चांगला भाव मिळाला होता. मात्र आवक वाढल्याने मिरचीच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली होती, परंतु जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मिरची लागवड केली असल्याने विक्रमी उलाढाल यावर्षी झाली आहे, तर येणाऱ्या हंगामात देखील उलाढालीच्या नवीन विक्रम होणार असल्याचे शक्यता दिसून येत आहे.

Published on: May 17, 2023 09:48 AM
त्र्यंबकेश्वर प्रकरणावरून ठाकरे यांच्यावर भाजप नेत्याचा निशाना; म्हणाला, ”हिरव्यांची मस्ती”, ”लेच्यापेच्याचं सरकार”
भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा सहाय्यक असल्याचा बनाव अन् मंत्रिपदाचं आमिष दाखवत भाजप आमदारांनाच घातला गंडा