आदिवासी पेहराव, पारंपारिक वाद्यांच्या तालावर नरहरी झिरवळ यांनी धरला ठेका

| Updated on: Aug 09, 2023 | 2:08 PM

लोकगीते गात, नृत्य करत आदिवासी बांधवांचा जल्लोष यावेळी पाहयाला मिळाला. यावेळी आदिवासी वेशभूषा करत नरहरी झिरवाळ सहभागी झाले.

मुंबई, 09 ऑगस्ट 2023 | दरवर्षीप्रमाणे आज म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी विश्व आदिवासी दिवस साजरा केला जात आहे. हा दिवस संपूर्णपणे जगातील आदिवासींना समर्पित आहे. आज देशभरात हा दिवस साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी आज कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. आज विधानभवन परिसरात आदिवासी दिन साजरा करण्यात आला आहे. लोकगीते गात, नृत्य करत आदिवासी बांधवांचा जल्लोष यावेळी पाहयाला मिळाला. यावेळी आदिवासी वेशभूषा करत नरहरी झिरवाळ सहभागी झाले. वाद्यांच्या तालावर नरहरी झिरवाळ थिरकले. विधानभवन परिसरात यावेळी उत्साह पाहायला मिळाला.

Published on: Aug 09, 2023 02:07 PM
संसद भवन परिसरात भाजपचं ‘क्विट इंडिया’; भ्रष्टाचार, परिवारवाद, भारत छोडोच्या खासदारांकडून घोषणा
‘यू आर नॉट इंडिया’, मणिपूर मुद्यावरून स्मृती इराणी यांच्याकडून राहुल गांधी यांचा समाचार