“संजय राऊत यांची मानसिकता संपली, त्यांचं डोकं ठिकाणावर नाही”, नारायण राणे यांचं टीकास्त्र

| Updated on: Jun 06, 2023 | 7:52 AM

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावरून टीका केली होती. देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले समजू शकतो. त्यांची मक्का मदिना दिल्लीत आहे. तुमचं दिल्लीत काय आहे? तुम्ही दिल्लीत मुजरा का करता? असा सवाल संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना केला.यावरून आता भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावरून टीका केली होती. देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले समजू शकतो. त्यांची मक्का मदिना दिल्लीत आहे. तुमचं दिल्लीत काय आहे? तुम्ही दिल्लीत मुजरा का करता? बाळासाहेब ठाकरे विस्तारासाठी कधी दिल्लीत जायचे काय? असा सवाल संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना केला.यावरून आता भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. “रविवारी मुंख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत गेले होते.यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय. राऊत याची मानसिकता संपली आहे. डोकं ठिकाण्यावर नाही. राऊत काहीही बोलत आहेत. उगाच प्रसिद्धी देऊ नका. राऊत बाजूला राहीलं बाकी दुसरं काही घडू शकतं.राहुल गांधीच कधी राज्यभिषेक होऊ शकणार नाही. साधं राहुल गांधीच लग्न झालं नाही राज्यभिषेक लांबची गोष्ट आहे”, असं नारायण राणे म्हणाले.

Published on: Jun 06, 2023 07:52 AM
Special Report | राष्ट्रवादी नेत्याच्या वक्तव्यावर अजित पवार यांचे स्पष्टीकरण मात्र शिवसेना नेत्यानं डिवचलंच; म्हणाला, ‘हे’ होणारच नाही!
राहुल गांधी यांच्या पंतप्रधान मोदी यांच्यावरील ‘त्या’ टीकेला भाजप नेत्याचं तिखट उत्तर; ”ज्याचं लग्न झालं नाही”