video : मी वाढवण्यासाठी सेनेत गेलो, पण राऊत ती सुपारी घेतली : राणेंची टीका
भाजपचे आमदार राम कदम यांनी काशी यात्रेचा उपक्रम हाती घेतला आहे. यावेळी ही ३ हजार भाविकांना ते काशीचे दर्शन दाखवणार आहेत. त्यासाठी आज ट्रेन सोडण्यात आली. यावेळी नारायण राणे यांनी त्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांनी राऊतांवर टीका केली.
मुंबई: ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. राऊत आणि राणे हे एकमेका विरोधात आरोप आणि टीका करत आहेत. यादरम्यान राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. त्यानंतर आता यांचा वाद वाढण्याची शक्यता आहे.
भाजपचे आमदार राम कदम यांनी काशी यात्रेचा उपक्रम हाती घेतला आहे. यावेळी ही ३ हजार भाविकांना ते काशीचे दर्शन दाखवणार आहेत. त्यासाठी आज ट्रेन सोडण्यात आली. यावेळी नारायण राणे यांनी त्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांनी राऊतांवर टीका केली.
शिवसेना वाढविण्यासाठी नारायण राणे शिवसेनेत होता. मी शिवसेना संपविण्याची सुपारी नाही घेतली. ती संजय राऊतने घेतल्याचा घणाघात राणे यांनी केला.
Published on: Jan 07, 2023 12:43 PM