Ram Kadam यांच्या काशी मोफत ट्रेनला नारायण राणेंनी दाखवला हिरवा झेंडा
कदम यांनी सुरू केलेल्या या अनोखा उपक्रमातून हजारो वृद्ध-आई वडिलांना काशीत भगवान विश्वनाथचे दर्शन होणार आहे. तर आतापर्यंत त्यांनी सात ट्रेनने घाटकोपरमधील भाविकांना काशीला नेले होते.
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी मोफत काशी यात्रा सुरू करत एक अनोखा उपक्रम सुरु केला. त्या उपक्रमाला आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपस्थिती लावली. तसेच काशीला जाणाऱ्या यात्रेकरुंच्या ट्रेनला हिरवी झेंडी दाखवली. नवीन काशी दाखवण्यासाठी व भाविकांना भगवान विश्वनाथचे दर्शन घडवण्यासाठी आमदार राम कदम मोफत काशी यात्रेचे आयोजन करत आहे.
कदम यांनी सुरू केलेल्या या अनोखा उपक्रमातून हजारो वृद्ध-आई वडिलांना काशीत भगवान विश्वनाथचे दर्शन होणार आहे. तर आतापर्यंत त्यांनी सात ट्रेनने घाटकोपरमधील भाविकांना काशीला नेले होते. शनिवारी ७ जानेवारी रोजी तीन हजार भाविकांची आठवी ट्रेन काशीला निघाली.
यावेळी नारायण राणे यांनी, मी यात्रेला शुभेच्छा देतो. आपण एकदातरी आई वडीलांना घेऊन देवदर्शन करतो मात्र राम कदम हे ३ हजार आई-वडीलांना देव दर्शनाला नेत आहेत. ते पुण्याचे काम करत आहेत. त्याला दिर्घ आयुष्य उत्तम आरोग्य लाभो. तो यशस्वी राजकारणी होवो अशा ही शुभेच्छा देतो.