केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तुळजापूर दौरा ऐनवेळी रद्द का केला?
नारायण राणे सहकुटुंब तुळजापूर देवीच्या दर्शनासाठी जाणार होते, पण...
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे तुळजापूर दौऱ्यावर जाणार होते. सहकुटुंब ते तुळजापूर देवीच्या (Tuljapur Devi) दर्शनासाठी जाणार होते. पण त्यांच्या हा दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. अचानक नारायण राणे यांचा तुळजापूर दौरा रद्द का करण्यात आला, हे अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र त्यावरुन तर्क वितर्क लढवले जाऊ लागले आहेत. नवरात्रोत्सव असल्यानं अनेक भाविक तुळजापूर तुळजा भवानी देवीच्या दर्शनासाठी जात असतात. नारायण राणे हे देखील देवीच्या दर्शनासाठी आपल्या कुटुंबासोबत जाणार होते. पण अचानक हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती आता समोर आलीय. दरम्यान, कालच सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दणका दिलाय. मुंबईच्या जुहू येथील अधीश बंगल्यातील बेकायदेशी बांधकाम पाडण्याचे हायकोर्टाने दिलेले आदेश सुप्रीम कोर्टाने कायम ठेवलेत. पालिकेनं नोटीस बजावल्यानंतर राणेंनी हायकोर्टात पालिकेच्या नोटिसीला आव्हान दिलं होतं. पण हायकोर्टाने पालिकेचे आदेश कायम ठेवले होते. त्यानंतर नारायण राणेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली. पण सुप्रीम कोर्टानेही अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश कायम ठेवले आहेत.