नारायण राणे यांच्या दुसऱ्या मुलाला हिसका दाखवला, मनीषा कायंदे यांची खोचक टीका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे नारायण राणे जेलमध्ये गेले,एक मुलगा जेलमध्ये,दुसरा तर दोन जाऊन आला, असे म्हणत बरोबर राणेंना पायरी दाखवले असे खोचक वक्तव्य मनीषा कायंदे यांनी केले.
मुंबई : औरंगाबादेत (Aurangabad) शिवसेना (Shivsena) महिला आघाडीच्या मेळाव्यात आमदार मनीषा कायंदे यांनी नारायण राणे यांच्या मुलाला जेलमध्ये टाकून हिसका दाखवला असे वक्तव्य केले,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे नारायण राणे जेलमध्ये गेले,एक मुलगा जेलमध्ये,दुसरा तर दोन जाऊन आला, असे म्हणत बरोबर राणेंना पायरी दाखवले असे खोचक वक्तव्य मनीषा कायंदे यांनी केले.राणेंच्या दुसऱ्या मुलाला म्हणजेच नीतेश राणे यांना हिसका दाखवला आणि पायरी दाखवली म्हणत भर मेळाव्यात शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी औरंगाबादेत राणे परिवाराला टोला लगावला.