2024 ला नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत, संजय राऊत यांचा दावा

| Updated on: Dec 30, 2023 | 7:58 PM

पुण्यातील शिवनेरीपासून सुरु झालेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा शेतकरी आक्रोश मोर्चाची सांगता आज झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या शेतकरी आक्रोश मोर्चाचा शेवटी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी शरद पवार, अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांची भाषणे झाली.

पुणे | 30 डिसेंबर 2023 : महाराष्ट्राचा स्वाभीमान, या महाराष्ट्राची अस्मिता या सध्याच्या सरकारने दिल्लीच्या वाटेवर पायपुसणीसारखी ठेवली आहे. पाय पुसायचे आणि पुढे जायचं, एक काळ होता, आपण म्हणायचो, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले,मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा, परंत आज महाराष्ट्र लुटला जातोय, शेतकरी लुटला जातोय. प्रत्येक उद्योग गुजरातला पळवला जातोय. टेस्ला आणि कोकणातला पाणबुडीचा उद्योग गुजरातला पळविला आहे. एकदाचं गुजरातला सोन्यानं मढवा असे प्रतिपादन संजय राऊत यांनी यावेळी केले. हिमालयाच्या मदतीला सह्याद्रीला धावतो. परंतू सह्याद्रीशी खेळण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा गरम पडेल असा इशाराही राऊत यांनी यावेळी दिला. सगळे एक्झिट पोल थोतांड आहे. 2024 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत. राज्यातही आघाडीचे सरकार येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Published on: Dec 30, 2023 07:57 PM
कांद्याप्रकरणी राज्यातील मंत्री लाचार झालेत, खासदार अमोल कोल्हे यांची घणाघाती टीका
आज शेतकऱ्यांकडे ढुंकून बघायलाही सरकार तयार नाही – शरद पवार