शिवसेनेचा खरा कणा शिवसैनिक

| Updated on: Jun 24, 2022 | 9:47 PM

राज्यात चाललेल्या बंडखोरी नाट्याचा कोणताही फरक भंडारा जिल्ह्यावर होणार नसून, आता आणखी जोमाने शिवसेना काम करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून राज्यातील राजकारणाला वेगळीच दिशा दिली. एकनाथ शिंदे यांच्यामुळे प्रहार संघटनेचे दोन आमदार सोडून सगळे आमदार हे शिवसेनेचेच फोडले मात्र भंडारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख नरेश डहारे, रश्मी पातुरकर यांनी मात्र शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांनी कोण कुठेही गेले तरी भंडारा जिल्ह्यातील शिवसेनेला काय फरकर पडणार नाही, आम्ही तुमच्यासोबतच राहणार असल्याचा विश्वास त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. राज्यात चाललेल्या बंडखोरी नाट्याचा कोणताही फरक भंडारा जिल्ह्यावर होणार नसून, आता आणखी जोमाने शिवसेना काम करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Published on: Jun 24, 2022 09:47 PM
Amabadas Danve | संजय शिरसाठांनी आपल्या मतदारसंघाचा दौरा कधी केला?
दिवे घाटात पालखीवर नजर ड्रोनची; पोलिसांची खास सोय