“सुषमा अंधारे यांना मनीषा कायंदे यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही”, शिवसेनेचा हल्लाबोल
विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी रविवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे सुषमा अंधारे यांना टोला लगावला होता. मनिषा कायंदे यांच्या आरोपांना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.अंधारेंच्या या टीकेला शिवसेनेचे प्रवक्ते नरेस म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई : विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी रविवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे सुषमा अंधारे यांना टोला लगावला होता. मनिषा कायंदे यांच्या आरोपांना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. एकादशीला मटण खाणाऱ्यांनी आम्हांला हिंदुत्व शिकवू नये. माझ्या गावाकडे म्हण आहे, निणंद्याला बारा बुद्ध्या. ज्याला नांदायचं नाही ते बारा कारणं सांगत असतात, असं अंधारे म्हणाल्या. अंधारेंच्या या टीकेला शिवसेनेचे प्रवक्ते नरेस म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “सुषमा अंधारे बाहेरून आलेल्या आहेत, त्यांना मनीषा कायंदेंवर बोलण्याचा अधिकार नाही. मनीषा कायंदे अधारें यांच्या सिनिअर आहेत, त्यामुळे त्यांनी बोलू नये”, असं नरेश म्हस्के म्हणाले.
Published on: Jun 20, 2023 07:20 AM