“पुरोगामी जितेंद्र आव्हाड यांनी तेव्हा सही का केली?”, नरेश म्हस्के यांचा खोचक सवाल

| Updated on: Jul 07, 2023 | 11:46 AM

"एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर २४ तासात राष्ट्रवादीकडून आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र तयार केलं होतं. अजित पवारांनी सांगितलं म्हणून आमदारांनी त्यावर सही केली होती. यामध्ये मी देखील सही केली होती," असा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाड यांनी केला. यावर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे.

ठाणे: “भाजपबरोबर जाण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडे होता. शिंदेंनी बंड केल्यानंतर २४ तासात राष्ट्रवादीकडून आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र तयार केलं होतं. अजित पवारांनी सांगितलं म्हणून आमदारांनी त्यावर सही केली होती. यामध्ये मी देखील सही केली होती,” असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. यावर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. “जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधी पूर्ण होण्याआधी भाजपसोबत सत्तेत जावं म्हणून सही केली होती. जर जितेंद्र आव्हाड स्वतःला पुरोगामी म्हणतात मग सही का केली? अजित दादांनी त्यांच्या डोक्यावर पिस्तूल ठेवली होती का? आव्हाडांची दुटप्पी भूमिका आहे. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली अशी परिस्थती आव्हाडांची आहे,” असा टोला म्हस्के यांनी लगावला आहे.

Published on: Jul 07, 2023 11:46 AM
रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून सत्ताधारी पक्षांमध्ये वाद? शिंदेंचा आमदार म्हणतो, “आदिती तटकरे पालकमंत्री नकोच”
“आता विरोधात बोलूच दिलं जात नाही”,उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका