सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला ‘असं’ म्हणणं म्हणजे अपमानच; अजित पवार यांचं टीकास्त्र
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायलयाच्या टिपण्णीचाही दाखलाही दिला आहे. पाहा व्हीडिओ...
नाशिक : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायलयाच्या टिपण्णीचाही दाखला दिला आहे. “सुप्रीम कोर्टाने या सरकारला नपुंसक म्हटल्याने हा सरकारचा अपमान आहे. जो पक्ष 145 चा आकडा गाठेल, त्या पक्षांचं सरकार सत्तेत येईलय याचं आत्मचिंतन करायला हवं, असं अजित पवार म्हणाले. भाजपच्या सावरकर गौरव यात्रेवरही अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या संविधानात सांगितलं आहे की, प्रत्येक जाती धर्माचा आदर करावा. महापुरुषांनी आपल्याला जी शिकवण दिली आहे, ती लक्षात घ्यावी, असं अजित पवार म्हणाले आहेत.
Published on: Mar 30, 2023 11:23 AM